मोदी सरकार चोर -कांग्रेस

0

फ्रेंच कंपनीकडून राफेल नावाचे भारतीय सेना दलासाठी विकत घेण्यात येणार्‍या विमानाच्या खरेदीमध्ये मोदी सरकारने तब्बल 41 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असून या भ्रष्टाचाराविरुध्द काँग्रेसने देशभर आंदोलन सुरु केले आहे. त्याचाच भाग म्हणून नांदेडमध्ये पक्षाच्यावतीने काढण्यात आलेल्या अतिविराट मोर्चाला काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. आयटीआयपासून निघालेल्या या मोर्चात जिल्हाधिकार्‍या कार्यालयापर्यंत काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

राज्याचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेवरुन जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने दि. २५ रोजी राफेल खरेदीच्या भ्रष्टाचार विरोधात मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सह प्रभारी आ. संपतकुमार, आशिष दुआ, पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जोगेंद्र कवाडे, माजी पालकमंत्री आ. डी. पी. सावंत, काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, आ.वसंतराव चव्हाण यांनी केले.

सकाळी नांदेड शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. परंतु या पावसाचा परिणाम मोर्चावर मात्र कुठेच दिसून आला नाही. सकाळी 9 पासूनच काँग्रेस कार्यकर्त्यांचे जत्थे आयटीआय परिसराकडे येऊ लागले. 11 सुमारास महात्मा फुले पुतळा परिसरात 20 हजारांपेक्षा अधिक काँग्रेस कार्यकर्ते एकत्रित आले होते. या ठिकाणी पक्षाच्यावतीने जाहीर सभा घेण्यात आली. या सभेमध्ये नरेंद्र मोदी सरकारने राफेल खरेदीमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफास करण्यात आला. यावेळी आ.संपतकुमार, आ.जोगेंद्र कवाडे, आ.डी.पी.सावंत, आ.अमरनाथ राजूरकर, आ.वसंतराव चव्हाण, लियाकत अली अन्सारी यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारवर चौफेर हल्ला केला. सूत्रसंचालन प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केले.

यानंतर या मोर्चास आयटीआयपासून सुरुवात झाली. पहिले टोक आयटीआय येथे तर मोर्चाचे शेवटचे टोक शिवाजीपुतळ्याजवळ होते. यावरुन मोर्चाची भव्यता सहज लक्षात आली. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी आ. संपतकुमार, आशिष दुआ,  आ. जोगेंद्र कवाडे, आ. डी. पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, आ. वसंतराव चव्हाण, माजी आ. हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, माधवराव पाटील जवळगावकर,रोहिदास चव्हाण, रावसाहेब अंतापूरकर,  प्रदेश सरचिटणीस बी. आर. कदम, जि. प. अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, महापौर सौ.शिला भवरे, उपमहापौर विनय गिरडे पाटील, स्थायी समितीचे सभापती शमीम अब्दुल्ला, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, जि. प. चे सभापती माधवराव मिसाळे, शिला निखाते,मनपाच्या सभापती संगीता तुप्पेकर, उपसभापती अल्का शहाणे, माजी महापौर अब्दुल सत्तार, बलवंतसिंघ गाडीवाले, काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर,सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, उपाध्यक्ष श्याम दरक, जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप पा.बेटमोगरेकर, बापूराव गजभारे, प्रवक्ते संतोष पांडागळे,मुन्तजिब, मसूदखान, डॉ. श्याम पाटील तेलंग,  शेषराव चव्हाण, नरेंद्र चव्हाण, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू कोंडेकर, शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे,प्रदेश सरचिटणिस अतुल वाघ, महिला काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकारी मंगलाताई निमकर, मंगलाताई धुळेकर, अनिताताई हिंगोले, मंगाराणी अंबुलगेकर,शिल्पा नरवाडे,  जिल्हाध्यक्षा कविताताई कळसकर, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष गंगाधर सोंडारे, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, मजूर फेडरेशनचे चेअरमन लक्ष्मीकांत गोणे,  विलास धबाले, माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, उपाध्यक्ष मारोती पटाईत, संजय पांपटवार, प्रल्हाद सुरकुटवार,सुभाष पाटील, सिमा राठोड, दिपक राऊत, किशोर स्वामी, आनंदराव चव्हाण, दयानंद वाघमारे, कविता मुळे, धम्मा कदम, संतोष मुळे, सुनंदा पाटील,दिपक पाटील, ज्योती कल्याणकर, किसन कल्याणकर, दिनेश मोरताळे, सखाराम तुप्पेकर, उमेश पवळे, सदाशिव पूरी, श्याम कोकाटे, व्यंकट मुदीराज, संजय भोसीकर, महेंद्र पिंपळे, जयश्री पावडे, निलेश पावडे, अपर्णा नेरळकर, ऋषीकेश नेरलकर, फारुखअली खान, किशोर भवरे, अनिकेत भवरे, राजू यनम,सुभाष रायबोळे, उमाकांत पवार, उमेश चव्हाण, संगीता पाटील डक, विठ्ठल पा.डक, अब्दुल अलिम, दुष्यंत सोनाळे, फेरोजभाई, नागनाथ गडम, भालचंद्र पवळे, प्रशांत तिडके, श्रीकांत गुंजकर, शेर अली, हबीब बागवान, बाबूखान गुत्तेदार,  रहिमखान, अब्दुल गफार, साबेर चाऊस, हबिब मोलाना, अब्दुल रसीद, सद्दाम, चाँद पाशा, अब्दुल शमीम, अहमद लतिफ, म.नासेर, गोविंद कोकुलवार, नागेश कोकुलवार, सुरेश हाटकर, अब्दुल हाफिज, बाबुभाई खोकेवाले, फारुख हुसेन, प्रकाश कौर खालसा, भानूसिंग रावत, अमितसिंग तेहरा, सुमीत मुथा, ईश्वर भय्या यादव, गुरमितसिंग नवाब, शोयब अशफाक,रमेश गोडबोले, अ.खईम, संदीप गायकवाड, संदीप सोनकांबळे, केशव मोकले, रुपेश यादव, दिपाली मोरे, संतोष मोरे, संजय मोरे, गंगाप्रसाद काकडे,अनिल पाटील खानापूरकर, बाबू गिरे, बालाजीराव पांडागळे, सुनिल शेट्टे, बच्चुराज देशमुख, राजू शेट्टे, जगदिश पा.भोसीकर, संभाजी भिलवंडे, केशवराव इंगोले, विजय चव्हाण, रविंद्र चव्हाण, राजू काळे, करुणा जमदाडे, श्रीनिवास जाधव, उदय देशमुख ललिता बोकारे, संजय कुलकर्णी, बाळासाहेब रावनगावकर, शिवाजीराव देशमुख, रामचंद्र मुसळे, सुभाष पा.दापकेकर, प्रफुल्ल सावंत, शिवराज पा. होटाळकर, प्रशांत चालिकवार, नारायण श्रीमनवार,निळकंठ मदने, संजय वडजे, भास्करराव जोमेगावकर, प्रमोद भुरेवार, अशोक कलंत्री, डॉ. नरेश रायेवार, डॉ. एन. के. सरोदे, जि. प. सदस्य संजय राठोड,जोगेंद्र नरवाडे, साहेबराव सावतकर, अरुणा सरोदे, केरबा सूर्यवंशी, सुनिल अटकोरे, दिनेश निखाते, मनोहर शिंदे, साहेबराव धनगे, भिमराव कल्याणे, गणेश शिंपाळकर, पंढरीनाथ कमठेवाड, डॉ.कालिदास मोरे, श्रीनिवास मोरे, रामराव नाईक, दिलीप बंदखडके बाबूराव पाथरडकर, शिवाजी पा.पाचपिंपळीकर,भाऊसाहेब मंडलापूरकर, लिंगूराम कवळे, अनंतराव केशवे, प्रा.राजेंद्र केशवे,  मुजिब जहागिरदार, बालाजी राठोड, सुनिल सरोदे, राजेश पावडे, अतूल पावडे, सोनू संगेवार, मोगलाजी सिरसेटवार, लक्ष्मण देवदे, नारायणराव सिडाम, प्रा.किशनराव किनवटकर, शेख सुलेमान, महेंद्र गायकवाड, अरविंद पवनकर, विजयसिंह चव्हाण, संदेश जाधव, विकास पानकर, संतोष अंकुशकर, अखिल सिद्दीकी, सुरेश शिवलाड, माधव जाधव, हनमंतु एलमवाड, अमित वाघ, संदीप लहानकर, सलमानभाई म.नदीम, अरविंद ठाकूर, किशनराव लोंढे, नितीन झरीकर, उज्वल केसराळे, स्वामी नुतपेलीवार, शौखत पठाण, संदीप शिंदे, किरण बोडके, बालाजी शिंदे, सुहास शिंदे, माधव  कदम, आदीत्य देवडे, जेसीका शिंदे, गोपी मुदीराज, सय्यद नौशात, सुषमा थोरात बाळू तिडके,विजय सोंडारे, दत्तू देशमुख, उमेश कोटलवार, रोहिणी हटकर, रेचल शिंदे, अझर कुरेशी अजिंक्य पवार, सतीष बसवदे, राहुल देशमुख ,अतुल बनसोडे, श्याम आढाव, जनार्दन बिराजदार, युवराज वाघमारे,  मदन देशमुख, बालाजी टेकाळे, स.निसार, अनिल गोनलवार, शंकर कंतेवार, सत्यपाल सावंत, हरविंदरसिंग कपूर, महेंद्रसिंग लागरी, तेजपालसिंग खेड, मनप्रितसिंग लागरी, हरबचनसिंग अरोरा, जसबिरसिंग चिमा, रविंद्र बुंगई, नबीद कादरी, नंदा देशमुख ज्योती पार्डीकर, प्रज्ञा रामटेके, रेखा परब, पुनिता रावत, मिनाक्षी कागडे, छाया कळसकर यांच्यासह जिल्हाभरातून हजारो कार्यकर्त्यांनी या महामोर्चात सहभाग नोंदविला. अतिविराट मोर्चामुळे मोदी सरकारविरोधी वातावरण पुन्हा एकदा तयार झाले आहे.

Leave A Reply