मोदी-शहा जोडगोळीने शामाप्रसाद मुखर्जी चा पुतळा पडल्यांनंतरच तोंड उघडाव का ?

0

पुतळा पाडा-पाडीला सुरवात होऊन दोन दिवस झाल्यानंतर मोदी-शहा जोडगोळीच तोंड उघडलं.नाक दाबल्या शिवाय तोंड उघडत नाही असं म्हणतात.
मोदी-शहा जोडगोळीने शामाप्रसाद मुखर्जी चा पुतळा पडल्यांनंतरच तोंड उघडाव हाही योगायोगच का?पुतळा पाडा पाडीत जे कोणी सामील आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करू म्हणतात. हा खरोखरच विनोदी पंच वाटतो.लेंनीन चा पुतळा पाडला त्याच समर्थन त्रिपुराच्या राज्यपालांनी केलं, राम माधव यानेही केलं. पेरियारचा पुतळा पडायचं आवाहन तर तामिळनाडूच्या भाजपच्या मोठया नेत्याने केलं.कारवाई करणार आहात त्यांच्यावर?
काहीही फेकतात “साले” (दानवेंची क्षमा मागून)कोणताही एक पुतळा पडतो तेंव्हा माणसां- माणसानं मध्ये एक “भिंत” उभी राहते. माणसांची मन दुभंगतात आणि मग राष्ट्रही दुभंगायला वेळ लागत नाही.आणि या प्रक्रियेत “सत्ताधारीच” सामील असतील तर मग तो देश तोडायला शत्रूचीही गरज रहात नाही. पाकिस्तानची तर नाहीच नाही.

◆◆◆◆★ चंद्रकांत वानखडे ★

Leave A Reply