मारुती म्हणजे हनुमान कोण ?

0
काळाच्या ओघात मात्र मारुतिचे दैवतीकरण झाले आणी त्याचा देव केला. मात्र सत्यता काही वेगळीच आहे. मारुति किंवा हनुमान बहुजनांचा एक रक्षणकर्ता होता. त्यालाच दुसर नाव ” बजरंग ” असेही आहे. हा शब्द ‘ बाजरंगी ‘ ह्या शब्दापासुन पासुन तयार झालेला आहे. बाज नावाच्या पक्ष्याच्या रंगाप्रमाणे तो असा हा त्याचा अर्थ आहे.
मारुति हा आमच्या गावाचा रक्षणकर्ता होता. आजही शक्तिच रुप म्हणौन आपण त्याच्याकडे बघतो. प्रत्येक गावात हनुमानाची मंदिरे आहेत. आजही नवरा मुलगा वरातिच्या अगोदर  घोड्यावर बसण्यापुर्वी मारुतिच्या पारावर जातो आणी त्याला पानाचा विडा अर्पण करतो. ह्यामागचा नेमका मतितार्थ आपण लक्ष्यात घेतला पाहिजे. पुर्वीच्या काळी आमच्यावर परकियांचे आक्रमण व्हायचे, आमच्या लेकी बाया पळउन घेउन जायचे. जेव्हा गावात लग्न व्हायची तेव्हाही आमच्या मुली पळउन घेउन जायचे. मग त्यासाठी जो नवरा मुलगा असायचा तो गावाच्या बाहेर असलेल्या ह्या मारुति नावाच्या संरक्षण अधिकार्याला विडा द्यायला जात असे आणी विनंती करत असे कि त्याने आणी त्याच्या सैन्याने आमच्या वरातीच रक्षण करावे. अगोदरच सांगितल्याप्रमाणे मरुत् हा केवळ एक पुरुष नाही तर अनेक जणांचा गण होता म्हणजे आमच्या माय मावल्यांचे रक्षण करणारी ति एक व्यवस्था होती. अश्या प्रकारे हा मारुति त्याच्या सैन्यासह गावतिल त्या लोकांचे नवरा आणी नवरी ह्यांच्या आप्तेष्टांचे रक्षण करायचा. आजही ती प्रथा जशीच्या तसी चालुच आहे मात्र त्यामागचा खरा आशय आमच्यापर्यंत येउच दिला नाही हा भाग वेगळा.
       मारुति कृषीसंस्कृतीचा पाईकच होता. मात्र त्याला शेपटी लाउन त्याच्यात व्यंग निर्माण केले. काही लोक म्हणतात कि पुर्वीच्या काळी आमच्या लोकान्ना शेपट्या होत्या. जर असे असेल तर मग तत्कालीन काही लोकांना शेपुट का नाही? मोठी नाही तर छोटी तरी लावायला पाहिजे होती! बर आम्ही आज टिव्हीवर ज्या मालिका बघतो, त्या मालिकांमध्ये मारुतीला आणी त्याच्या वानर सेनेला रितसर शेपट्या दाखवल्या जातात मात्र त्यांच्याच स्रीयान्ना ज्या वानरच आहेत त्यान्ना मात्र शेपट्या दाखवल्या जात नाहीत. ह्याचा कधी आम्ही तार्किक विचार केलाय का?… तर नाही! कारण आम्ही आजही धर्मव्यवस्थेच्या मानसिक गुलामगिरित आकंठ बुडालेलो आहोत.
विचार करा…
संदर्भ- बळीवंश
– डाॅ आ ह साळुंखे
(संस्कृत प्रकांड पंडीत, ईतिहास संशोधक)

Leave A Reply