“ये बाबासाहब कहां से आया..?”

0
 राज्यसभेत भाजपच्या मंत्रिमंडळात समाजकल्याण मंत्री असलेल्या रामदास आठवलेंनी संविधान बदलण्याची आणि धर्मनिरपेक्ष वृत्तीवर हल्ला करण्याची अघोरी भाषा वापरणाऱ्या अनंत हेगडे या भाजप मंत्र्याची व त्या पक्षाची जोरदार पाठराखण केली. एखादा माणूस सत्तेच्या स्वार्थासाठी किती खाली पडू शकतो, याचा आठवलेंनी काल त्यांच्या प्रत्यक्ष वर्तनाने एक नमुनाच सादर केला. त्यांचे कालचे ते समर्थन म्हणजे खरेतर एका ‘छिनाल’ वृत्तीचेच द्योतक होते! सबंध आंबेडकरवाद्यांनी या वृत्तीचा कडाडून विरोध व जाहीर निषेध केला पाहिजे.तसेच व्यंकय्या नायडू यांनीही त्याच सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा “ये बाबासाहब कहां से आया..?” “…वो तो ड्राफ्टिंग कमिटी का चेअरमन था!” -असा एकेरी व उद्धट उल्लेख केला. नायडूचाही आपण निषेधच केला पाहिजे. आणि ज्या संविधानाची शपथ घेवून हे लोक संविधान विरोधी भाषा करतात; आणि संविधान-निर्मात्याचा अपमान करतात, त्यांना ‘राष्ट्रद्रोही व संविधानद्रोही’ संबोधून त्यांची त्यांच्या संविधानिक पदावरून हकालपट्टी करत शिक्षा ठोठावली पाहिजे!

Leave A Reply