चेट्रीचंड उत्सवाची तयारी जोरात

0
नागपूर : सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झूलेलाल यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजितयारी चेट्रीचंड उत्सवाची त जोमात सुरु झाली आहे. यानिमित्ताने इतवारी किराणा ओळीतून शोभायात्रा काढली जाणार आहे. श्री झुलेलाल किराणा मर्चंट संघाद्वारे हा उत्सव गेल्या ७० वर्षापासूंन साजरा केल्या जात आहे. येत्या१८ मार्च रोजी चेट्रीचंड उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
            मस्कासाथ येथील नारायणदास अँण्ड सन्स  ( खजुरवाला ) येथे आयोजित एका बैठकीत यंदाही उत्सव  रविवार १८ मार्च रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यंदा संभाजी कसार मस्कासाथ हीरा कुटी येथे संतोष सेल्स कार्पोरेशन प्रतिष्ठानमध्ये सकाळी ९ वाजता बैराणा साहेबची स्थापणा करुन उत्सवाला सुरूवात होईल. यानिमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रम होईल. सांयकाळी ६ वाजता किराणा ओळ येथून भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. अशी माहिती गोस्वामी यांनी दिली. भगवान झुलेलालसह महापुरुषांची वेशभूषा परिधान केलेले कलावंत यात सहभागी होतील.  शोभायात्रेची सांगता गांधी सागरजवळील झुलेलाल मंदिरात होईल. उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी पुरूषोत्तम खंडवाणी, नारायण हरियाणी, तुलसीदास खंडवाणी , जगदीश बसरानी, विजय आमेसर, आदी अनेक पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

Leave A Reply