तेली समाजाची कार्यकारणी

0

उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची उमरगा तालुक्याची कार्यकारणी शासकिय विश्रामगृह उस्मानाबाद येथे जिल्हाकार्यकारणीच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. नियुक्ती पत्राच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सेवनिवृत विस्तार अधिकारी लक्ष्मण निर्मळे प्रमुख पाहुणे ह.भ.प. मुकुंद महाराज कोरे तसेच जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर , जिल्हाउपाध्यक्ष राजाभाऊ घोडके , जिल्हा सचिव अॅड विशाल साखरे , यांच्या उपस्थितीत उमरगा कार्यकारणी जाहिर करण्यात आली. उमरगा तालुक्याच्या अध्यक्षपदी संतोष गुंडाप्पा कलशेट्टी यांची निवड करण्यात आली. शिवानंद ईराप्पा कलशेट्टि व रविकिरण महालिंग अंबुसे या दोघांची उपाध्यक्षपदी तसेच सिध्देश्वर विश्वनाथ कलशेट्टी व बसवराज चन्नप्पा कलशेट्टी या दोघांची कार्याध्यपदि निवड करण्यात आली . इंद्रजीत शिवाजी म्हेत्रे यांची कोषाध्यक्ष पदि निवड करण्यात आली.शिवानंद बाबुराव साखरे यांची सचिव पदि शिवकुमार बाबुराव दळवी यांची प्रसिध्दी प्रमुख पदि ,बस्वेश्वर बसाप्पा साखरे यांची संपर्कप्रमुख पदि प्रविण शिवाजी अंबुसे यांची सहसचिवपदि ,विजय कलशेट्टी यांची संघटकपदि सिध्दाप्पा शंकर घोडके व सदाशिव विश्वनाथ रोकडे व विजयकुमार गुरुनाथ देशमाने यांची तालुका मार्गदर्शकपदि नंदू तुकन्ना साखरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या सर्व नूतन पदाधिकार्यांचे जिल्हा कार्यकारणीच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन हार श्रीफळ देऊन यतोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नूतन पदाधिकारी यांना जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांनी पुढील कार्य करण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमास लोहारा तालुकाध्यक्ष भिमाशंकर डोकडे उपाध्यक्ष उमाशंकर कलशेट्टि यांची उपस्थिती होती. या सदरील निवडी कार्यक्रमास येणेगुर, भुसणी, मुरूम, उमरगा,गुजोटी, तुरोरी, कसगी, तुगाव ,या गावातील तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन अॅड विशाल साखरे ,परमेश्वर साखरे यांनी मानले .

Leave A Reply