पुरंदरे यांच्या विरुद्ध नुकसान भरपाई पोटी एक कोटी

0
स्पेशल मुकदमा नं.105/2011 यामध्ये वादी डॉ राजीव सोपानराव चव्हाण विरुद्ध ब.मो.पुरंदरे पुणे (प्रतिवादी)यामध्ये छत्रपति शिवाजी महाराज ,मासाहेब जिजाऊ व सम्पूर्ण मराठा समाजाची बदनामी केली म्हणून पुरंदरे यांच्या विरुद्ध नुकसान भरपाई पोटी एक कोटी रुपये द्यावेत असा दावा केला होता तो अजुनही चालू आहे.वादीचे वकील एडवोकेट अनंतराव दारवटकर व प्रतिवादीचे वकील अंतरकर व पुराणिक होते.यामध्ये  दावा दाखल केल्यानंतर चार पांच तारखा झाल्यानंतर बमो पुरंदरेच्या वकीलाने मेहरबान कोर्टात दावा फेटाळून लावावा म्हणून आर्डर 7 रूल खाली अर्ज दिला होता .त्यामध्ये महत्वाचे 3 मुद्दे मांडून या मुद्याखाली दावा फेटाळून लावावा अशी विनंती बमो पुरंदरेच्या अर्जामध्ये होती.ते मुद्दे या प्रमाणे-दाव्यास कारण घड़लेले नाही,दावा मुदतीत केला नाही.अशी पुरंदरे यांच्या मार्फत मांडणी केली गेली होती.यावर मेहरबान कोर्टात जोरात वाद विवाद झालेला होता.अखेर मेहरबान कोर्टाने वादीच्या बाजूने म्हणजे डॉ चव्हाण यांच्या बाजूने निकाल दिला. त्यावेळेस मेहरबान कोर्ट श्रीयुत कुलकर्णी होते.यावर प्रतिवादी बमो पुरंदरे यांनी मुंबई हायकोर्टात अपील दाखल केले परंतु तेथेही पुरंदरे यशस्वी झाले नाही.अखेर मुंबई हायकोर्टात बमो पुरंदरे यांचे अपील फेटाळण्यात आले व वादी राजीव सोपानराव चव्हाण हे विजयी झाले.सध्या मेहरबान कोल्हापुर कोर्टात पुराव्याचे काम चालू आहे.
             डॉ राजीव चव्हाण यांच्या वतीने एडवोकेट अनंतराव दारवटकर काम पाहत आहे.एडवोकेट दारवटकर हे छत्रपति शिवाजी महाराज,छत्रपति संभाजी महाराज यांचा खरा इतिहास लिहिणारे सुप्रसिद्ध इतिहासकार आहेत,तसेच त्यांना इतिहासचार्य ही संबोधले जाते.बमो पुरंदरे यांना एकीकडे फड़णवीस सरकार ने महाराष्ट्र जनतेच्या विरोधाला न जुमानता महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला पण जनता मात्र पुरंदरे यांनाच छत्रपति शिवाजी महाराज,मासाहेब जिजाऊ यांची बदनामी करणारे मानते आहे त्यात वस्तुस्थिती आहे .पुरंदरे ने जे शिवचरित्र लिहिले त्यात छत्रपति शिवाजी महाराज,मासाहेब जिजाऊ आणि संपूर्ण मराठा समाजाची येथेच्छ बदनामी केली आहे. बमो पुरंदरे यांना त्यांच्या हयतीत न्यायालयात खेचले आहे. मुंबई हायकोर्टात पुरंदरे सपशेल हारले ही बाब फारच महत्वाची आहे तरी देखील मीडिया ने याबाबत एका ओळीचे सुद्धा वृत्त न दाखवने याला काय म्हणायचे? मीडिया बमो पुरंदरे ला का वाचवित आहे? छत्रपति शिवाजी महाराज ,मासाहेब जिजाऊ यांची बदनामी करणारे पुरंदरे हे सोशल मीडिया वर एकीकडे टिका व टिंगलिचे विषय बनले आहेत तर ब्राम्हण-बनिया मीडिया मात्र छत्रपति शिवाजी महाराज ,मासाहेब जिजाऊ यांची बदनामी करणाऱ्या पुरंदरेस मात्र वाचवित आहे.

Leave A Reply