तुकाराम महाराज यांचा जयंती महोत्सव

0

मुंबई: संत शिरोमणी, जगतगुरु तुकाराम महाराज यांचा जयंती महोत्सव उपक्रम 24 जानेवारी 2018 रोजी, कुणबी ज्ञाती गृह, वाघे हॉल, परेल, मुंबई येथे कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई व कुणबी युवा मंडळ यांच्या वतीने घेण्यात आला होता. प्रथमच हि जयंती कुणबी-बहुजन समाजाच्या वतीने मुंबई नगरीत साज्त्री करण्यात आली. यावेळी तुकोबाराय यांच्या जीवनावर संघ खजिनदार तुकाराम लाड सर यांनी माहिती दिली. संत तुकाराम महाराज यांचे आम्ही वारसदार आहोत. त्यांचे गुण अंगीकारणे आज गरजेचे आहे. तुकोबांचे साहित्य काही मनुवादी लोकांनी तोडमोड करून लिहिले आहे तर काही साहित्यात घुसखोरी करून त्याला धार्मिक रंग दिला आहे. वास्तविक तुकाराम महाराज हे अन्याय, अंधश्रद्धा, अत्याचार यावर जाहीर ‘वार’ करणारे वारकरी होते. त्यांचे अभंग हे समाजाला प्रबोधन करणारे आहेत. कुणबी बहुजन समाजातील तरुणांनी त्यांचे साहित्य वाचायला हवे.

Leave A Reply