कोकणात गावकर परिषद”

0

कुणबी समाज लांजा तालुक्याच्या वतीने “कोकणात गावकर परिषद”समाज बांधवांची उपस्थिती, नव्या सामाजिक नियमावलीची दिली योग्य दिशा…
“लांजा तालुका कुणबी समाज गावकर परीषद”कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न शाखा तालुका लांजा ग्रामीणआणि कुणबी सेवा संघ, लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळावर दि. 16 जानेवारी 2018 रोजी सकाळी ११ वाजता, कुलकर्णी छात्रालय, लांजा शहर, जिल्हा रत्नागिरी येथे “लांजा तालुका कुणबी समाज गावकर परीषद” संपन्न झाली. तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेले सरपंच, सदस्य, पंचायत समिती सदय, पस्थित मान्यवर गावकर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
वयोवृद्ध ग्रामस्थ म्हणजेच गावातील मुख्य “गावकर” यांना सरकारी पेन्शन मिळावी म्हणून या परिषद मध्ये चर्चा करण्यात आली आणि तसा ठरावही पास करण्यात आला. तालुक्यातील एकूण ४५ गावकर बंधू व वाडी प्रमुख यांनी परिषदेला उपस्थिती दाखविली होती. कुणबी बहुजन समाज जागृत होत आहे हे यावरून दिसून आले. गावकर परिषदेच्या माध्यमातून तालुका संघ शाखा मजबूत करण्यावर भर देण्यात आला . मोक्याच्या व महत्वाच्या ठिकाणी असताना ही समाज कसा अजूनही अस्तिर आहे, हे या वेळी परिषद अध्यक्ष बी. टी. कांबळे (लांजा ग्रामीण शाखाध्यक्ष) यांनी गाव्काराना समजावून दिले. समाजाला प्रबोधन होणे गरजेचे आहे, हक्क अधिकार याची जन्जागुर्ती करण्यसाठी आम्ही पुढाकार घेत आहोत तसेच ग्रामीण ठिकाणी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे वचन शाखा अध्यक्ष शांताराम आगरे यांनी दिले. त्यांनी आपले नव्या क्रांतीचे विचार उपस्थित ग्रामस्थांना समजावून सांगितले. मुंबई शाखा सचिव सुभाष पालकर, कुणबी युवा लांजा युवाध्यक्ष. शशिकांत पालकर, सर्व पदाधिकारी, कुणबी उद्योजक प्रकाश तरळ, बळीराजा शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष संभाजी काजरेकर, ज्योती वाडेकर, अँड. मनोहर मांडवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ही परिषद यशस्वी करण्यासाठी लांजा ग्रामीण शाखा कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. शाखा अध्यक्ष बी. टी. कांबळे, सेक्रेटरी चंद्रकांत परवडी, घडशी, कुलये, भितले, वालम, दुडये, डफळे तसेच अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. समाजाला दिशा देणारे अनेक ठराव यावेळी चर्चा करून समंत करण्यात आले.

Leave A Reply