अलौकिक शक्तिंची भीति दाखवून शारीरिक,आर्थिक,लैंगिक व मानसिक शोषण -कटरे

0

स्वामीविवेकानंद महाविद्यालय आमगांव च्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोनाविरोधी कायदा या विषयावर प्रात्यक्षिकांसह मार्गदशन  .जगात गुढ़वादी-दैववादी vs बुद्धिप्रमान्यवादी-विज्ञानवादी विचारसरणी असा प्रवास सुरु आहे.विज्ञानवादी विचारसरणीने कार्यकारणमीमांसा करुन निसर्गतिल गुढ़ शक्तिंचा शोध लावून रानटी अवस्थेतिल माणसाला चंद्रावर पाठविन्याईतपत प्रगतअवस्थेत आणून सोडले आहे.आजही मानुस तंत्रमंत्र-जादूटोना,भूतभानामती, आत्मा,दैवी चमत्कार,बुवाबाबांच्या पाच हजार वर्षाच्या शब्दप्रमान्यावर श्रद्धा ठेऊन निर्माण झालेल्या आंधश्रधाना बळी पडून स्वतः ची कसी फसवणूक करतो सोदाहरण स्पष्ट करण्यात आले.एखादा मांत्रिक, बुवा वा व्यक्ति तंत्रमंत्र वा अलौकिक शक्तिंची भीति दाखवून शारीरिक,आर्थिक,लैंगिक व मानसिक शोषण कारित असेल तथा प्रचारप्रसार करित असेल तर जादूटोनाविरोधी कायद्यान्तर्गत गुन्हा दाखल करण्याचे आव्हान करण्यात आले.

जय विज्ञान।। जय संविधान। जय भारत।

Leave A Reply