शामराव पेजे जन्मशताब्दी महोत्सव’

0

शामराव पेजे स्मृती न्यास आणि कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शामराव पेजे जन्मशताब्दी महोत्सव’ चिपळूण येथे हजारो बांधवांच्या उपस्थित संपन्न झाला. रविवार दि. २१ जानेवारी २०१८ रोजी सकाळी 10 वाजता, न्यू इंग्लिश स्कूल, चिपळूण, कोकण येथे या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री ना. अनंत गीते, कोकणातील आमदार सदानंद चव्हाण, भास्कर जाधव, उदय सामंत, नवी मुंबईचे मा. उपमहापौर अविनाश लाड, बकुणबी संघाचे अध्यक्ष भूषण बरे, न्यास अध्यक्ष एड. सुजित झिमण, हरिशचंद्र गीते, डॉ. गोविंद जोशी, कुणबी उच्चाधिकार समितीचे माजी अध्यक्ष शंकरराव म्हसकर, कुणबी रत्नागिरी समन्वय समितीचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे, हूजन विकास आघाडीचे सुरेश भायजे, चंद्रकांत परवडी, कुणबी सेनेचे जिल्हाध्यक्ष दादा बैकर, प्रदीप उदेक, संजय खापरे, रावनंग, कुणबी युवा मुंबईचे अध्यक्ष माधव कांबळे माजी आमदार बाळ माने, कुणबी समाजोन्नती संघ, चिपळूण शाखाध्यक्ष चंद्रकांत कोकमकर, उपाध्यक्ष चंद्रकांत निर्मळ, युवाचे गजानन वाघे, अमेय खापरे, विष्णू खापरे तसेच रत्नागिरीच्या प.स. अध्यक्ष मेघना पाष्टे, सदस्य साक्षी रावणग, चिपळूण प.स. उपसभापती शिगवण, कुणबी बहुजन समाजातील अनेक मान्यवर आणि समाज पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी किसान साद या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. कोकणचे नेते..लोकनेते शामराव पेजे यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा उलघडा नव्या पिढीसाठी आदर्शवत असून तो नव्या पिढीला ग्रंथरूपाने असावा आणि तो सरकारने प्रकाशित करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच शामराव पेजे यांचे स्मारक उभारून स्पर्धा परीक्षा अकादमी सुरु करण्या यावी. कोकणच्या कुणबी समाजाचे बेदखल कुळांचे प्रश्न मार्गी लावावेत. आरोग्य, शिक्षण, रोजगार यावर लोक प्रतिनिधींनी आता लक्ष घालवे असे आवाहन मंचावरून करण्यात आले. या सोहळ्यासाठी कोकणातील हजारो बांधव उपस्थित राहिले होते.
__________

Leave A Reply