संभाजीराजांची बदनामी करणे,हेच का संघाचे विचारधन

0

छत्रपती संभाजीराजे शूर,पराक्रमी आणि बुद्धिमान होते.निद्रेचे चार तास सोडले तर ते वीस तास स्वराज्यासाठी लढत होते.त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्याना करमुक्त केले.सर्वजातिधर्मातील महिलांचा आदर केला. ते चारित्र्यसंपन्न होते.त्यांनी ब्राह्मणमंत्र्याच्या अरेरावीला पायबंद घातला.त्यांनी आपल्या आजी जिजाऊंचा व वडिलांचा प्रत्येक शब्द शिरसावंद्य मानला.त्यांनी बुधभूषण,नखशिख,नायिकाभेद आणि सातसतक हे चार ग्रंथ लिहिले.त्यांना मराठी,हिंदी,संस्कृत इत्यादी भाषाप्रमाणेच इंग्रजी भाषा देखील उत्तमप्रकारे अवगत होती.शंभूराजे शिवरायांना पन्हाळाभेटीत म्हणाले”दूधभात खाऊन तुमच्या पायाची सेवा करेन पण राज्याची वाटणी नको”,म्हणजे संभाजीराजे स्वराज्यनिष्ठ आणि शिवनिष्ठ होते.ब्राह्मणमंत्र्याच्या जाचातून वाचण्यासाठी त्यांना दिलेरखानाकडे जावे लागले व स्वतःचा प्राण वाचवावा लागला,असे प्राच्यविध्यापंडित शरद पाटील म्हणतात.शंभाजीराजानी सावत्रमाता आणि सावत्रबंधु राजारामांचा आदर आणि सांभाळ केला,असे वा. सी. बेंद्रे आणि डॉ जयसिंगराव पवार सांगतात.समकालीन ऍबे करे म्हणतो की “संभाजीसारखा पराक्रमी,विद्वान आणि सुंदर राजपुत्र भारतात पाहिला नाही”
अशा नीतिमान शंभुराजाबद्धल राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचे दिवंगत सरसंघचालक गोळवलकर गुरुजी विचारधनमध्ये लिहितात(bunch of thoughts) “…पुढे मदिरा आणि मदिराक्षीच्या आधीन झालेल्या संभाजीची पापी नजर खंडोजीच्या बहिणीकडे वळली.खंडो बल्लाळानी बहिणीच्या शीलाचे रक्षण करण्यासाठी तिला आत्महत्या करण्याची अनुमती दिली,परंतु संभाजीविषयीची राजनिष्ठा सोडली नाही कारण संभाजीच्या अंगी व्यक्तिशः कितीही दुर्गुण असले,तरी उगवत्या हिंदू स्वराज्याच्या एकतेचे ते प्रतीक होते”.संभाजीराजे दुर्गुणी,दारुडे आणि सहकाऱयांच्या बायका पळवणारे होते, असे लेखन गोळवलकरांनी केले आहे.
संभाजीराजे दुराचारी तर खंडो बल्लाळ म्हणजे महापुरुष असे गोळवलकर म्हणतात “खंडो बल्लाळसारख्या वीरपुरुषाच्या आत्माहुतीमुळे स्वराज्याचा तो स्फुल्लिंग धडाडून पेटू लागला आणि त्या यज्ञाच्या ज्वालामध्ये स्वतः औरंगजेबाचीच आहुती पडली.दक्षिणेतच औरंगजेबाची कबर बांधली गेली”संभाजी पापी आणि बल्लाळ महापुरुष,असे गोळवलकर म्हणतात.संभाजीराजांचा उल्लेख एकेरीवर आणि बल्लाळचा आदराने,हा संघाचा असली चेहरा आहे.(संदर्भ-विचारधन-गोळवलकर,प्रथमावृत्ती दि 13 ऑगस्ट 1971,पृष्ठ क्र 341)संभाजीराजांसारख्या महापुरुषांची बदनामी करणे आणि ब्राह्मणी वर्चस्वासाठी त्यांची प्रतिमा वापरणे हा संघाचा दुष्ट हेतू आहे.मोदी-फडणवीस सारखे असंख्य संघ कार्यकर्ते विचारधन(bunch of thoughts) वाचूनच घडले आहेत.संभाजीराजांची बदनामी करणे,हेच का संघाचे विचारधन ?.या ग्रंथाला संघाचे बायबल म्हटले जाते.शंभुराजाला पापी,दारुडा,व्यभिचारी ठरविणाऱ्या संघाच्या विकृतीबद्धल भागवत,मोदी,फडणवीस आणि संघिष्टानी वढू बु येथे जाऊन संभाजीराजांच्या समाधीसमोर माफी मागायला पाहिजे.
—श्रीमंत कोकाटे
(इतिहास व इतर समांतर विषयांचा अभ्यासक)

Leave A Reply