गुलाबाची लागवड

0

व्यावसायिकदृष्ट्या गुलाबाची लागवड
जमिन:-
गुलाबाची लागवड करण्याकरिता एक विशिष्ट प्रकारची जमीनच लागते असे नाही तर अशा अनेक प्रकारच्या जमिनी आहेत कि जेथे गुलाब लागवड करता येते. सुपीक सेंद्रिय खतेयुक्त, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन गुलाब लागवडीसाठी चांगली असते. जमीन मुक्त चुनायुक्त असावी. जमिनीची सामू ६ ते ७.५ च्या दरम्यान असावी. आशाप्रकारच्या जमिनीत गुलाबांच्या फुलांचाही दर्जा निपजतो. भारी, सखोल, चूनखळीयुक्त दलदलीची तसेच खडकाळ, वरकस जमिनीत गुलाबाची वाढ व उत्पादन चांगले येत नाही. ४० ते ६५ से.मी. जमिनीच्या थराखाली नरम मुरुमाचा थर असल्यास गुलाबाच्या झाडांची वाढ चांगल्याप्रकारे होते. भारतातील हवामानाचा विचार करता अनेक भागात गुलाबाची यशस्वी लागवड करण्यासारखी परिस्थिती आहे.
व्यापारी शेती उत्पादनासाठी जांभया दगडापासून तयार झालेल्या लोम या लालसर जमिनी गुलाबाच्या वाढीसाठी योग्य असतात. आशा जमिनीचा सामू ६ ते ६.५ असतो. पाणी व्यवस्थापनाकरिता बारमाही पाण्याची उपलब्धता असणे गरजेचे असते. निवडलेल्या क्षेत्रावर भरपूर सूर्यप्रकाश पडावा व पश्चिम व दक्षिण दिशेस वाऱ्याच्या तीव्र वेगापासून किंवा गरम वार्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेवरी सारखे काटक पिक लावावे. संबधित जमिनिपासून वाहतूक वा दळणवळण सोपे जावे अशी सोय असावी.

हवामान:-
यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो. तापमान, सूर्यप्रकाश, आद्रता, पाऊस, दव, धुके, गारपीट, वारा इ. चाळीस अंश से. पेक्षा तापमानात वाढ झाली असता पानांना व फुलकळ्यांना इजा होऊन ते कोमेजतात. आर्द्रता ८० टक्क्यापेक्षा अधिक वाढली तर दमटपणामुळे अनेक बुरशीजन्य रोगांचा प्रसार होतो. कोरडी हवा असल्यामुळे फुले लवकर कोमेजतात व लवकर वाळतात. गुलाबास उत्तमप्रतीची फुले लागण्यासाठी दिवसातून ६ – ७ तास तरी सुर्प्रकाश मिळायला हवा. काही हवामानात गुलाब वर्षभर फुलतो तर काही हवामानात वर्षभरापैकी ठराविक काळातच फुले येतात. तसेच धुके, गारपीट, वारा या बाबींमुळे बरेच नुकसान होते.गुलाबाच्या चांगल्या वाढीसाठी व दर्जेदार उत्पादनासाठी मध्यम प्रकारचे हवामान, भरपूर स्वच्छ सूर्यप्रकाश आवश्यक असतो. आपल्याकडे असे हवामान बऱ्याचशा शहरामध्ये जास्त काळ उपलब्ध असल्यामुळे म्हणजेच जून ते ऑक्टोबर मध्ये पाउस व त्यानंतर थंड, कोरडे, स्वच्छ हवामान उपलब्ध असल्याने आपणास जून ते मार्च या कालावधीत उत्तम फुले मिळतात.
खते:-
मातीचे पृथाक्करण करून जमिनित खालच्या थरात चुनखडी अथवा ईतर खडे भरतांना ईतर खतांची बेगमी करावी.
१) कम्पोस्ट खत
२) बोनामील
३) निंबोळी पेंड
४) डायनोमिनियम फॉस्फेट अथवा सुपर फोस्फेट
५) मॅग्नेशियम सल्फेट
६) जीवाणू खत
खालील तक्त्याचा वापर करावा

१) कम्पोस्ट खत ४० टन एकरी प्रमाण १०० टन हेक्टरी प्रमाण
२) बोनामील ४०० kg एकरी प्रमाण १००० kg हेक्टरी प्रमाण
३) निंबोळी पेंड ४०० kg एकरी प्रमाण १००० kg हेक्टरी प्रमाण
४) डीएपी २०० kg एकरी प्रमाण ५०० kg
५) मॅग्नेशियम सल्फेट ४० kg एकरी प्रमाण १०० kg हेक्टरी प्रमाण
६) जीवाणू खत १० kg एकरी प्रमाण २५ kg हेक्टरी प्रमाण
टीप:- १. सुरुवातीस रासायनिक नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा.
२. कम्पोस्ट खताबरोबर एकरी ४० kg (हेक्टरी १०० kg) बीएचसी भुकटी १० टक्के
मिसळावी.
३. श्यक्य असल्यास जमिनीत तागाचे अथवा ईतर हिरवळीचे खताचे एखादे पिक सोयीप्रमाणे घ्यावे.
लागवड:-
जमिनीच्या उभ्या व आडव्या ३० – ४० सें.मी. खोलीपर्यंत नांगरट, कुळवणी करून सर्व प्रकारची गवताची बेटे, तन गोळा करून शेत सपाट व स्वच्छ करून प्रती ४० आर क्षेत्रात २० मे. टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. व्यापारीदृष्ट्या गुलाबाची लागवड करण्यासाठी ६० सें.मी. बाय ६० सें.मी. चे खड्डे गुलाबाच्या जातीप्रमाणे तयार करावेत. जमिन थोडी भारी प्रकारची असल्यास चार भरणेसाठी चांगल्या मातीत अंदाजे ४ ब्रास बारीक वाळू मिसळून मिश्रण तयार करावे. दोन झाडांमध्ये योग्य तेवढा अंतर ठेवावा. लागवड शकतो पावसाळी हंगामात सायंकाळी करावी. लागवडीसाठी चांगले कलम वापरावे. कलम चरीमध्ये व्यवस्थित लावावे. लागवडीपूर्वी वाफ्यावरील माती संपूर्णपणे निर्जंतुक करून घेणे आवश्यक आहे.

भविष्यात अश्याच प्रकारच्या विविध माहिती याच वेगवेगळ्या मार्गाने आम्ही आपल्याला देणार आहोत तरी तुम्ही आमच्याशी जुळू शकतात.

http://www.heeraagro.com/ या वेबसाईट ला भेट देऊन.

www.facebook.com/heeraagro या फेसबुक पेजला लाईक करून.

आपले नाव , गाव , whats app द्वारे 9422207468 या नंबर वर पाठवून.

तुमच्या whats app group मध्ये 9422207468 हा नंबर अॅड करून.

हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 8482992826 / 8668949698 / 7741903237 / 9284000511, 512 / 513 / 514 / 515 / 516

Leave A Reply