माफीवीरांनाही स्वातंत्र्यवीर ठरविण्यात यांचा हात कोणी धरू शकत नाही

0

स्वतःची फुसकीही कसा मोठा” बॉंम्ब”होता हे पटवण्यात व विरोधकांचा फुटलेला बॉम्ब सुद्धा कसा “फुसका” होता हे सिद्ध करण्यात हिंदुत्ववादी तरबेज आहेत.माफीवीरांनाही स्वातंत्र्यवीर ठरविण्यात यांचा हात कोणी धरू शकत नाही “भ्रमित करावे सकळ जन” या त्यांच्या ध्येया प्रमाणे गांधींचा हत्यारा नथुराम नाही हे सिद्ध करण्याचा त्यांनी न्यायालया मार्फत प्रयत्न चालवला आहे. चौथी गोळी, ब्रिटिशांचा हात वगैरे कथानक रचून संभ्रम निर्माण करणे व या संभ्रमित वातावरणाचा फायदा घेत गांधी हत्येच्या आरोपातून सावरकरांची “निर्भेळ” सुटका करणे असा हा “प्लाट”तशी तर गांधी हत्येतील आरोपी क्रमांक सात असलेल्या सावरकरांची न्यायालयाने “निर्दोष” मुक्तता केली होती. पण कपूर कमिशनचा अहवाल, तुषार गांधींचे “लेट्स किल गांधी” सारखे पुस्तक असो यामुळे गांधी हत्येची संशयाची सुई सावरकरांवरून कधी हटली नाही.
योगायोगाने सत्ता त्यांची असतांना सावरकरांवरील हा किटाळ दूर करता यावा यासाठी चा खटाटोप.पण तोही प्रयत्न उधळल्या सारखा दिसतोय.गांधी हत्येचा “कट” रचुन आधी हत्या करायची, त्या हत्येची कारण द्यायची, गांधींची हत्या केली नसती तर देशाचं किती नुकसान झालं असत अस म्हणत त्याला “देशभक्ती”चा मुलामा चढवायचा. गेल्या सत्तर वर्षात त्यात यश येत नाही म्हटल्यावर नवीन “कट”रचुन तो सिद्ध करण्याचा प्रयत्न करायचा.एक कटाला खोट ठरविण्यासाठी दुसरा कट. कटकारस्थाना पलीकडे त्यांच्या कडून दुसरी कोणती अपेक्षा ठेवावी?

●●● चंद्रकांत वानखडे ●●●

Leave A Reply