पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी कामावरून कमी केलेल्या कंत्राटी सफाई कामगार

0

चंद्रपूर येथील शासकीय दवाखान्यात कंत्राटी कामगार म्हणून मागील ८-१० वर्षापासून काम करणार्या कामगारांना दवाखान्याची मालकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालया कडे आल्याबरोबर ठेकेदार तोच असला तरी कामगारांना सफाईच्या ठेका कामावरून काढणे हे स्वतःला विकास पुरूष म्हणून मिरविणार्या सुधिर मुनगंटीवार यांनाच शोभते। ठेकेदार हिताची कामे करण्यासाठी जिवाचा आटापिटा करणारे व केवळ श्रेय घेण्यासाठी धडपडणाऱ्या पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी येत्या २-३ दिवसांत कामावरून कमी केलेल्या कंत्राटी सफाई कामगारांना कामावर परत न घेतल्यास कंत्राटी कामगारांनी स्वयंघोषीत विकास पुरूषाला हळद लाऊन बांगड्या भरण्याचे आंदोलन घ्यावे। मी व आमचे कार्यकर्ते आपल्या सोबत राहू अशी हमी देत आज दा ९ जाने २०१८ ला दुसरा २ वा जटपूरा गेटवर प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांचे नेतृत्वाखाली पेंडाल टाकून आंदोलन करणार्या मंडळाला आज भेट दिली।
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलकांच्या व कामगार संचालकांच्या प्रतिनिधींना डावलून परस्पर मंत्रालयात बैठक बोलावून अन्यायग्रस्त आंदोलक, नेतृत्व करणारी प्रहार संघटना यांचा अपमान केला आहे। तेव्हा श्रेय लाटण्यासाठी धडपडणाऱ्या मुनगंटीवार चा निषेध करीत अन्यायग्रस्त सफाई कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला तो प्रसंग।
बळीराज धोटे

Leave A Reply