लोकशाहीचा खरा अर्थ ,बळीराजा पार्टी

0

आजही भारत देशात असे ७०% ते ८०% लोकं असे आहेत ज्यांना संविधानात्मक लोकशाहीचा खरा अर्थ कळलेलाच नाही. व ज्यांना कळला त्या अल्पसंख्याक प्रस्थापित समूदायाने एकूणच भारतीय मानवी प्रजातीवर आपला हक्क गाजवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. जसं काही त्यांनी शोषण करण्याचा हक्कच मिळवलेला आहे. व त्यांचा असा गैरसमज आपल्या सामाजिक, राजकीय अजाणतेपणामुळे झाला आहे हे आपल्याला टाळता येणार नाही. मूळात या देशातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक उदासीनतेमुळे आपल्याला आपल्याच हक्कांचा विसर पडला आहे. आपल्यालाच आता सवय झाली आहे आपल्या चूकांच खापर इतरांवर फोडून शांत बसण्याची. मला तर आश्चर्य वाटते आहे की, जगातील एकमेव सर्वात मोठी संविधानात्मक लोकशाही म्हणून गणल्या जाणाऱ्या भारत देशामध्ये हे सर्व घडतेय. ज्या देशाचा इतिहास थोर महापुरुषांच्या महात्म्यावर आधारित आहे. हे या देशातील लोकांच दुर्दैव आहे असंच म्हणावं लागेल. आजही या देशात प्रस्थापितांनी तयार केलेल्या गुलामी मानसिकतेत लोक जगत आहेत. आणि याला मुख्यतः दोन व्यवस्था जबाबदार आहेत असं मला वाटते. त्यातील पहीली म्हणजे स्वार्थी अघोरी राजकारण आणि दुसरी शिक्षणव्यवस्था ज्यामध्ये जातीला लक्ष्य केलं जाते व धार्मिक अंधश्रद्धेचं बीजारोपण केलं जाते. मला वाटते जर या देशातील या दोन्हीं व्यवस्थेत जर वेळीच आपण बदल करण्याचा प्रयत्न केला नाही तर निश्चितच पुन्हा लोकशाही डोकं वर काढू पाहणार नाही व धर्माच्या,जातीच्या नावाखाली आपण आपल्याच लोकांच्या कत्तली केल्याशिवाय राहणार नाही कारण आजपर्यंत आपण हेच करत आलोय.. अजून वेळ गेलेली नाही, जागे व्हा.

👆👆👆महेश घरजारे अध्यक्ष बळीराजा राष्ट्रीय पार्टी तालुका लाखनी.

Leave A Reply