संताजी दिनदर्शिका – २०१८ प्रकाशन

0

श्री. संताजी सहाय्यक संघाच्या श्री. संताजी दिनदर्शिका – २०१८ चे प्रकाशन बुधवार, दि. २७.१२.२०१७ रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री. किरण चौधरी व माजी-अध्यक्ष श्री. कमलाकर शेलार यांच्या हस्ते, तसेच सर्वश्री चंद्रकांत झगडे (उपाध्यक्ष), विकास रहाटे (उपाध्यक्ष), राजेंद्र सावंत (वधु-वर केंद्र प्रमुख), मंगेश इप्ते, सुधिर राऊत, गणेश राऊत, सुशिल रहाटे, निवृत्ति गरिबे, रुचिकेत सावंत, सौ. स्नेहा शेलार, सौ. पुष्पलता रहाटे, सौ. पुनम थोरात, सौ. स्मिता रहाटे, सौ. सुप्रिया डिचोलकर, सौ. ऋतु सावंत, सौ. अनिता चौधरी, कु. मयुरी चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

                             अध्यक्ष श्री. किरण चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, अत्यल्प काळात जाहिराती गोळा करुन सुबक दिनदर्शिका छपाई केल्याबद्दल सर्व कार्यकारिणी सदस्यांचे आभार मानले व सर्व जाहिरात दारांना धन्यवाद दिले.दिनदर्शिकेचे समाजबांधवना मोफत वितरण करण्यात येणार आहे. दिनदर्शिका घरपोच मिळविण्यासाठी श्री. सुजितकुमार रसाळ (सचिव) यांच्याशी संपर्क साधावा.

एकमेकां सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ!

सुजितकुमार रसाळ (सचिव)
९३२४६०४३२८ / ९८६९६३५४१९

Leave A Reply