.कुणबी कब्बडी लीग २०१७

0

कुणबी युवा खेड, यांच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच ……कुणबी कबड्डी लीग.चे आयोजन करण्यात आले होते….प्रचंड गर्दीचा उच्चांक मोडत सलग टीम दिवस स्पर्धा रंगली होती,पाच हजार क्रीडारसिकांनी प्रचंड दिला पाठींबा..कर्णधार सुजित शिंदे यांचा गोवळकर रायडर अंतिम विजेता.तर प्रशांत चव्हाण यांचा कृष्णाई फायटर उपविजेता..कोकणात प्रथमच शेतकरी वर्गाचा मातीतील खेळ ‘ कब्बडी’ याचे भव्य-दिव्या आयोजन खेड येथे २२-२३-२४ डिसेंबर २०१७ रोजी, कल्की मंदिर, भरणा नाका, खेड येथे करण्यात आले होते. कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई तालुका शाखा खेड आणि कुणबी युवा खेड यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कुणबी समाजाला व युवकांना जागृत करणारी हि स्पर्धा मान-सन्मान देणारी ठरली….जय कुणबी

Leave A Reply