ओबीसी जातनिहाय जनगणना मागणी

0

युवा युवती व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचे महा अधिवेशन, बुधवार दि. २० डिसेंबर २०१७ रोजी, सकाळी १० ते ५ या वेळेत पार पडले, राष्ट्रीय ओबीसी महासंघ आयोजित, डॉ. प्रा. बबनराव तायवाडे सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या अधिवेशनाच्या स्वागताध्यक्ष कु. पूजा मानमोडे होत्या, सकाळी प्रथम नागपूर शहरातून रैली काढण्यात आली. धनवटे नेशनल कॉलेजच्या भव्य हॉलमध्ये हजारो युवक युवतींच्या उपस्थित अधिवेशन संपन्न झाले. विधान परिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे, आमदार सुनील केदार, आमदार आशिष देशमुख, मा. मंत्री विजय वडेट्टीवार, जेष्ठ साहित्यिक जैमिनी कडू, अनेक आमदार, खासदार तसेच कुणबी युवा मुंबईचे अध्यक्ष माधव कांबळे हे उपस्थित होते. प्रसिद्ध वक्ते गणेश हलकारे सर यांनी जबरदस्त मार्गदर्शन केले. नियोजन उत्तम होते, महिला, युवक-युवती यांची मेहनत प्रचंड होती, सचिव सचिन राजूरकर यांनी एकूण १८ ठराव मांडले व सभागृहातून ते मंजूर करण्यात आले. मुंबईतून या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचा योग आला. संपूर्ण महाराष्ट्रातून युवा प्रतिनिधी उपस्थित होते.
ओबीसी जातनिहाय जनगणना, स्वामिनाथन आयोग, मंडळ आयोग आणि हक्क अधिकार यावर उपस्थितांनी विचार मांडले, मार्गदर्शन केले. सामाजिक प्रबोधन,कमी करण्यात आलेली स्कॉलरशिप, मेडिकल प्रवेश आणि ओबीसी विद्यार्थी यांची उच्चशिक्षणात होत असलेली पीछेहाट… असे विषय हाताळण्यात आले. २०२१ सालात जातनिहाय जनगणना करावी हा प्रमुख मागणीचा विषय आहे. अनेक राजकीय नेते, आमदार तसेच ओबीसी आणि समाजिक संघटनाचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

Leave A Reply