2 हजाराची नोटही माघारी ?

0

नोटाबंदीनंतर चलनात आलेली २,००० रुपयांची नोटही माघारी घेतली जाण्याची शक्यता वर्तवितानाच नव्याने छापलेल्या १५.७८ लाख कोटी मूल्याच्या नोटांपैकी २.४६ लाख कोटींहून अधिक मूल्याच्या नोटा चलनात आल्या नसल्याची शंका स्टेट बँकेने व्यक्त केली आहे.

केंद्रीय अर्थ खाते आणि रिझव्‍‌र्ह बँकेने दिलेल्या माहितीच्या आधारावर स्टेट बँकेने हा अहवाल तयार केला आहे. त्यात नवीन २,००० रुपयांची चलनी नोट मागे घेतली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने नोटाबंदीनंतर छापलेल्या मोठ्या मूल्याच्या नोटांपैकी अधिकतर नोटा प्रत्यक्षात चलनात आल्या नसल्याचे कारण देण्यात आले आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने १५,७८,७०० कोटी रुपये मूल्याच्या नोटा नोव्हेंबर २०१६ मधील नोटाबंदीनंतर छापल्या; मात्र पैकी २,४६,३०० कोटी रुपयांच्या नोटा अद्यापही चलनात आलेल्या नाहीत, असे स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष म्हणाले. रिझव्‍‌र्ह बँकेने छापलेल्या ५०० रुपयांच्या नोटांची संख्या १,६५७ कोटी तर २,००० रुपयांच्या नोटांची संख्या ३६५ कोटी असल्याची माहिती अर्थ खात्याने लोकसभेला दिली आहे.

Leave A Reply