नागपूर स्मार्ट बनत चालले आहे

0

मार्ट नागपूर…!
नागपूर स्मार्ट बनत चालले आहे. अत्याधुनिक सुविधांसह शहर सौंदर्यीकरणालाही स्मार्ट सिटीत विशेष महत्त्व आहे. रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकांवर रंगीबेरंगी फुलांची झाडे लावण्याचे प्रयोगही सुरू आहेत. एकीकडे असे प्रयोग सुरू असताना हिंगणा मार्गावरील दुभाजकांवर मात्र खास शेणाच्या गोवऱ्या थापण्यात आल्याचे चित्र दिसून येते. चक्क दुभाजकांवर थापलेल्या गोवऱ्या आता शहरातील नागरिकांच्या आणि नागपूरला भेट देणाऱ्या पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. एका रांगेत थापण्यात आलेल्या गोवऱ्या बघून ‘नागपूरकरांचा नवा प्रयोग’ अशा कमेंट्सही मिळू लागल्या आहेत.

Leave A Reply