ओबीसी सेवा संघाने राज्य अधिवेशन पापळ या भाऊसाहेबाच्या जन्मगावात

0

पापळ (वाढोणा)*:- ओबीसी सेवा संघ हे कर्मचारी अधिकारी शेतकरी विद्यार्थी व ईतर बुध्दीजीवी वर्गाचे सामाजिक विचारपीठ आहे. कष्टकरी शेतकरी व ओबीसी समाजासाठी आपल्या जीवाचे रान करणार्‍या भाऊसाहेब डॉ पंजाबराव देशमुख यांचे विचार आम्ही तळागाळातील जनमानसात पोहचवु असे प्रतीपादन प्रदीप ढोबळे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी सेवा संघ यांनी केले.ते पापळ (वाढोणा) येथे, ओबीसी सेवा संघ महाराष्ट व्दारा आयोजित 8 वे राज्य अधीवेशनात बोलत होते.

*पापळ वाढोणा* हे गाव अमरावती जिल्ह्य़ात असुन भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव आहे . भाऊसाहेबाचे विचार , कष्टकरी,शेतकरी जनतेसाठी असलेली तळमळ, त्याचे विचार जगाला माहीत करण्यासाठी ओबीसी सेवा संघाने राज्य अधिवेशन पापळ या भाऊसाहेबाच्या जन्मगावात घेतले.मा.नागेश चौधरी नागपूर यांच्या कार्याचा गौरव *”कर्मवीर पुरस्कार”* देऊन सन्मान करण्यातआला.

अधीवेशनाचे उद्घाटन *मा माधवी खोडे (IAS),*अप्पर आयुक्त आदिवासी विकास यांनी केले.

या प्रसंगी *मा.स्वप्निल वानखडे IAS,* मा.निशा शेंडे अमरावती यांनी मार्गदर्शन केले.सकाळी 10 वाजता गावातुन संविधानाचा व भाऊसाहेबाच्या विचाराचा जयजयकार करीत *संविधान दिंडी* काढण्यात आली.खुशाल ठाकरे ग्रामगीताचार्य,गजानन अमदाबादकर शेतकरी नेते,विजय अजबले सरपंच पापळ,
डॉ राजेश पांडे,धानोरा गुरव ,रत्नाताई सोनवणे धुळे हे भाऊसाहेब डॉ पंजाबराव देशमुख विचारपिठावर उपस्थित होते.

*ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी,ओबीसीचा घटनाविरोधी क्रिमीलेअर रद्द करण्यात यावा, ओबीसी शेतकरी यांना शेतीसाठी मोफत साहीत्य पुरविण्वियात यावे,विद्यार्थी साठी 100% स्कालरशीप देण्यात यावी* व ईतर ओबीसींच्या विकासासाचे ठराव अधिवेशनात पास करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातुन मोठ्या संख्येने प्रतीनीधी उपस्थित होते.या
कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र गद्रे महासचिव प्रास्तविक दिगंबर दळवी मुंबई
व आभार रमेश धुळे जिल्हाध्यक्ष अकोला यांनी केले.

Leave A Reply